राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरलेला अभिनेता आयुष्मान खुराना याच्यासाठी “अंधाधुन’ हा चित्रपट यादगार ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल तर केलीच शिवाय त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेताच्या पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला. या चित्रपटाच्या वर्षपुर्तीवेळी आयुष्मान म्हणाला, सर्वोष्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकाविणा-या या चित्रपटाने मला खूप काही मिळवून दिले आहे.
एका पाठोपाठ सलग 6 ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा आयुष्मानने सांगितले की, एक कलाकार म्हणून मी सतत अभिनयाचे बारकाने शिकणारा एक विद्यार्थी आहे. मी सतत अशा चित्रपटाच्या शोधात असतो जे मला आणखीन चांगला अभिनय शिकवू शकतील. जे माझे विचार, माझया विश्वासाला आव्हान देणारे असतील आणि नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी मला प्रेरित करतील. “अंधाधुन’ वास्तवात असा चित्रपट आहे, ज्याने मला आज एका उत्कृष्ट अभिनेत्याची ओळख निर्माण करून दिली आहे.
दरम्यान, आयुष्मानला आज कॉन्टेंट चित्रपटाचा पोस्टर बॉय मानले जात असून बॉलिवूडमधील सर्वाधिक चांगल्या स्क्रिप्ट निवडणारा अभिनेता समजले जाते. “अंधाधुन’ हा एक सस्पेंस थ्रिलर चित्रपट असून यात आयुष्मानने एका अशा पियानो वाजविणा-याची भूमिका साकारली होती, जो आंधळा असल्याचे नाटक करत असतो.