बंगळुरू – कर्नाटकातील तुमकुरू येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अजानचा आवाज ऐकून आपले थांबवले. राहुल गांधी जाहीर सभेला संबोधित करत असताना त्यांना अजानचा आवाज ऐकू आला, त्यानंतर त्यांनी तात्काळ आपले भाषण थांबवले आणि इतर लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा राहुल गांधी भाषण देत होते, तेव्हा काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल राहुल गांधींकडे आले आणि त्यांना अजानबद्दल सांगितले, त्यानंतर राहुल गांधींनी त्यांचे भाषण थांबवले.
‘भाजपचे 40 टक्के कमीशन सरकार’
जाहीर सभेत राहुल गांधींनी जनतेला आवाहन करत यावेळी तुम्हाला तुमचे सरकार बनवायचे आहे, असे सांगितले. मागच्या वेळीही तुम्ही भाजपचे सरकार बनवले नाही पण भाजपने आमदार विकत घेऊन लोकशाही नष्ट करून सरकार स्थापन केले. राहुल गांधी म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत भाजपने केवळ भ्रष्टाचार केला आहे. कर्नाटकातील जनता भाजप सरकारला 40 टक्के कमीशन सरकार म्हणते, याचा अर्थ प्रत्येक कामात ते जनतेकडून 40 टक्के कमिशन घेतात.
#WATCH कर्नाटक: कांग्रेस नेता राहुल गांधी ने तुमकुरु में एक जनसभा को संबोधित करने के दौरान अज़ान की आवाज सुनकर अपने भाषण को रोका। pic.twitter.com/Qu7N0IjbqO
— ANI_HindiNews (@AHindinews) May 1, 2023
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांनाही याची माहिती आहे, पण त्यांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई का केली नाही, हे मला त्यांना विचारायचे आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा निवडणूक प्रचार तीव्र होत आहे. राहुल गांधी आज कर्नाटकमध्ये तीन जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. राहुल गांधी तुमाकुरू, अर्सिकेरे आणि चामराजनगरमध्ये जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. दरम्यान, कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मेला मतमोजणी होऊन निकाल प्रसिद्ध होणार आहे.