बेंगळुरू – कर्नाटकातील काँग्रेस आमदार नारा भरत रेड्डी ( Congress MLA Nara Bharat Reddy) आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग तपासाचा एक भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने ( ED raids) शनिवारी डझनहून अधिक ठिकाणी छापे टाकले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. बेल्लारी येथील ३४ वर्षीय आमदारांची ठिकाणे आणि तेलंगणातील इतर काही ठिकाणी ही छापे मारी करण्यात आली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी रेड्डी यांच्या बेल्लारी आणि बेंगळुरू येथील ठिकाणांचा शोध घेतला.जमिनीच्या गैऱव्यवहाराच्यां प्रकरणांमध्ये ही छापेमारी करण्यात आली आहे. या आमदारांचा खाण उत्खननाचा व्यवसाय आहे. तथापि या छापेमारी प्रकरणामागे राजकीय सूड भावना असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. या छाप्यांमध्ये नेमके काय हाती लागले याचा तपशील अजून जाहीर करण्यात आलेला नाही.