करिना कपूरने काही महिन्यांपूर्वी आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. आता ती पुन्हा काम करण्यास उत्सुक आहे. करिनाने डायरेक्टर हंसल मेहता यांच्या आगामी नवीन सिनेमात काम करण्याचे मान्य केले आहे. हंसल मेहता आणि करिना दोघेही करोनाचे वातावरण निवळण्याची वाट बघत आहेत. “स्कॅम 1992′ सारखी सुपरहिट वेबसीरिज केल्यानंतर हंसल मेहता हेदेखील आता खूप व्यस्त झाले आहेत.
अलीकडच्या काळात ते परेश रावल यांच्या मुलाबरोबर एक सिनेमा करत आहेत. त्यानंतर लगेचच या नवीन सिनेमाची घोषणा केली जाईल. आमीर खानबरोबरच्या “लाल सिंग चढ्ढा’मधील करिनाचे शूटिंग आता संपले आहे.
किरकोळ शूटिंगनंतर याचे पोस्ट प्रॉडक्शन सुरू होईल आणि ख्रिसमसच्या मुहूर्तावर “लाल सिंग चढ्ढा’ रिलीज होईल. या दरम्यान हंसल मेहता आणि करिना कपूर यांच्या नवीन सिनेमाची सगळी जुळणी पूर्ण झाली असेल आणि त्याबाबतचे अन्य तपशीलही जाहीर झाले असतील.