“निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या उमेदवारांना त्वरीत शासकीय सेवेत सामावून घ्या”; संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्याने राज्य सरकारसमोर नवा प्रश्न पडला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजामधून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. हीच नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असल्याचे दिसत आहे.

राज्यात या विषयावर चर्चा सुरू असून, छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्य सरकारकडून विविध पर्यायांची पडताळणी सुरू आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. राज्य सरकारकडून हालचाली केल्या जात असतानाच छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नोकर भरतीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.