मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच OTT वर पदार्पण करणार आहे. करीन चित्रपट निर्माते सुजॉय घोष यांच्या क्राइम थ्रिलर चित्रपटातून धमाकेदार पदार्पण करणार आहे. ‘जाने जा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. मात्र सध्या करीना तिच्या चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. करीना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात राष्ट्रगीताला उभी राहण्याच्या पद्धतीवरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
एका कार्यक्रमासाठी रेड आउटफिट परिधान केला होता. व्हिडिओमध्ये ती इतर महिलांबरोबर राष्ट्रगीताला उभी राहिलेली दिसत आहे. मात्र करीनाची राष्ट्रगीताला उभी राहण्याची पद्धत नेटकऱ्यांना खटकली आहे. यावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “राष्ट्रगीताला सावधान उभं राहतात हाताहात पकडून उभं राहत नाही, हे कोणीतरी हिला सांगा.” दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “राष्ट्रगीत गाताना सावधान उभं रहायचे ही गोष्ट स्टार्सला माहित नाही, हे खूपच लज्जास्पद आहे.”
View this post on Instagram
दरम्यान, ‘जाने जा’ चित्रपटामध्ये करीनासोबत अभिनेता जयदीप अहलावत आणि विजय वर्मा झळकणार आहेत. येत्या 21 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय ‘द क्रू’ चित्रपटातही करीना दिसणार असून 2024 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधी करीना ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता.