शेतात राबताना दिसले कराडचे खासदार

श्रीनिवास पाटील यांचे ट्‌वीट व्हायरल

कराड – अस्सल मातीशी जोडला गेलेला नेता असतो ना त्याला मानमरातब, पद यापेक्षा काळ्या आईची सेवा करण्यातच मोठा आनंद असतो, हे पुन्हा एकदा दिसून आले. कराड जि. सातारा येथील सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत असलेल्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या मारुल हवेली येथील शेतात लावलेला खपली गहू कापतानाची छायाचित्रे ट्‌वीटरवर शेअर केली आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार असलेल्या पाटील यांनी भाजपामध्ये गेलेल्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा दणदणीत पराभव केला होता. वर्ष 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सातारा मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले होते. मात्र, लोकांशी आणि मातीशी पक्की नाळ असलेल्या श्रीनिवास पाटील यांनाच मतदारांनी उचलून धरले होते.

आपल्या पूर्वायुष्यात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त अशी स्वच्छ कारकिर्द घडवलेल्या पाटील यांची लोकप्रियता आजही का टिकून आहे, त्याचे उदाहरण म्हणून या ताज्या ट्‌वीटकडे पाहता येईल.

 

आपल्या ट्‌वीटमध्ये श्रीनिवास पाटील म्हणतात, दिवाळीनंतर लावलेला खपली गव्हाच्या कापणीला आला होताच. सप्ताहांताच्या दिवशीचा लॉकडाऊन असल्याने गोटे, कराड येथील संपर्क कार्यालय बंद होते. मोकळा वेळही मिळाला. हातात विळा घेऊन तयार झालेला खपली गहू कापून घेतला आणि हा वेळ सत्कारणी लावला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.