“धाकड’मध्ये कंगनाचे ऍक्‍शनपॅक्‍ड सीन

कंगना राणावत नेहमीच तिच्या सिनेमासाठी 100 टक्‍के योगदान देते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. कंगनाने तिच्याबद्दलचा हा समज आपल्या कष्टाने सार्थ ठरवला आहे. आता तर कंगनाने इंन्स्टाग्रामवर जी स्टोरी पोस्ट केली आहे, 

त्यावरून तिची कष्टाची तयारी किती आहे, हे समजू शकते. आगामी ‘धाकड’ या सिनेमाची तयारी म्हणून कंगना फाईट सीनची प्रॅक्‍टिस करताना दिसते आहे. कंगनाने हातात एक लोखंडी रॉड धरलेला आहे आणि ती दोन जणांशी एकाचवेळी फाईट करताना दिसते आहे. 

फाईट सीनची प्रॅक्‍टिस म्हणून कंगनाचे ट्रेनिंग सुरू असतानाचा हा व्हिडीओ आहे. या ट्रेनिंग दरम्यान तिची एनर्जी बघूनच हे सीन पडद्यावर किती जबरदस्त दिसतील, याची कल्पना करता याऊ शकते. ‘धाकड’मध्ये कंगनाला खूप ऍक्‍शन सीन करायचे आहेत. 

तिच्याबरोबर अर्जुन रामपालदेखील असणार आहे. सिनेमाचा बहुतेक शूटिंग बुडापेस्टमध्ये झाले आहे. अर्जुनने तिथले शेड्युलने अलीकडेच संपवले आहे. ‘धाकड’ व्यतिरिक्‍त कंगनाचे ‘थलायवी’ही येणार आहे. 

‘थलायवी’साठी कंगनाने वजन वाढवले होते. लगेचच पुढच्या सिनेमासाठी तिला ऍक्‍शन रोल साकारायचा असल्यामुळे वजन कमी करावे लागले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.