प्रभास ठरला आशियातील सर्वांत हॅन्डसम व्यक्‍ती

मुंबई – अलीकडेच आशिया खंडातील सर्वांत हॅन्डसम व्यक्‍तींची यादी प्रसिद्ध झाली आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे 2021 मधील आशिया खंडातील सर्वात हॅन्डसम व्यक्‍तींच्या या यादीमध्ये प्रभासने पहिला क्रमांक पटकावला आहे. 

“बाहुबली’नंतर प्रभासची लोकप्रियता प्रचंड वाढली. त्याला अनेक चांगल्या सिनेमांचे प्रस्तावदेखील मिळाले आहेत. ‘आदिपुरुष’ आणि ‘राधे शाम’सारखे सिनेमे त्याच्या लीस्टमध्ये आहेत. आता आशियातील सर्वात हॅन्डसम व्यक्‍ती ठरल्यामुळे त्याचा भाव चांगलाच वधारला आहे. या यादीमध्ये दोन पाकिस्तानी कलाकारांचाही समावेश आहे. 

तर पहिल्या 10 मध्ये सातव्या क्रमांकावर आणखीन एका भारतीय विवियन डिसेनाची वर्णी लागली आहे. विवियन हा एक टीव्ही कलाकार आहे. ‘शक्‍ती – अस्तित्व के एहसास की’, ‘प्यार की ये एक कहानी’, ‘खतरों के खिलाडी 7’ सारख्या शोमधून बघितले गेले आहे. 

या दोघांव्यतिरिक्‍त थायलंड, तैवान, दक्षिण कोरिया, चीन, व्हिएतनाम आणि जपानमधील कलाकार या हॅन्डसम व्यक्‍तींच्या यादीमध्ये निवडले गेले आहेत. ऑनलाईन व्होटिंग आणि सोशल मीडियावरील रेटिंगच्या आधारे ही यादी निश्‍चित केली गेली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.