मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या रिअॅलिटी शो ‘लॉक अप’मुळे सतत चर्चेत असते. कंगनाच्या शोशी संबंधित दररोज काही ना काही व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. त्याचवेळी कंगनाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला काही फोटो शेअर केला आहे. त्या फोटोखाली अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रीने ‘गँगस्टर’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट 2006 मध्ये 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज 16 वर्षे झाली आहेत. या चित्रपटाला बॉलिवूड प्रवासाशी जोडत कंगनाने एक पोस्ट केली आहे जी व्हायरल होत आहे.
कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले या फोटोला तिने लांबलचक कॅप्शन दिले. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘गँगस्टर 16 वर्षांपूर्वी या दिवशी 28 एप्रिल 2006 रोजी रिलीज झाला आणि मी अभिनेत्री म्हणून माझा प्रवास सुरू केला.’ अभिनेत्रीने पुढे लिहिले, आज, 28 एप्रिल 2022, प्राइम व्हिडिओचा पाचवा वर्धापन दिन साजरा करताना, मी मणिकर्णिका फिल्म्सची पहिली निर्मिती ‘टिकू वेड्स शेरू’ लाँच केली. याच दिवशी मी निर्माता म्हणून माझा प्रवास सुरू करत आहे. प्राइम व्हिडिओचे खूप खूप आभार. या कॅप्शनसह कंगना रणौतने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कंगनाने रेड कलरचा पोशाख परिधान केला आहे. अभिनेत्रीचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडले आहे.