नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात मागील एका महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. यातच आंदोलनाववर टीका करत अभिनेत्री कंगना राणावतने पंजाबमधील 73 वर्षीय मोहिंदर कौर यांचा आंदोलनात सहभागी झालेला फोटो ट्विट करून या आजी शाहीन बाग आंदोलनातही होत्या. त्यांना 100 रुपये दिले की त्या आंदोलनात येतात अशी ट्विट करत टीका केली होती. मात्र कंगनाला हे ट्विट चांगलेच भोवले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार पंजाबच्या वयोवृद्ध शेतकरी आंदोलक मोहिंदर कौर यांनी कंगनावर थेट मानहानीचा खटला आपल्या वकिलाद्वारे दाखल केला आहे. या खटल्याची सुनावणी 11 जानेवारीला पंजाबचे स्थानिक न्यायालय करणार आहे.कंगनाबाबत माध्यमांशी बोलतांना या कौर आजीने तिला सल्लाही दिला आहे. त्या म्हणाल्या अभिनेत्री कंगनाच्या विचार न करता केलेल्या विधानांमुळे समाजात, गावात, शेजाऱयांत आणि नातेवाईकांत मोठी बदनामी होत आहे. तिने माझ्यावर केलेल्या आरोपामुळे मला मानसिक त्रास होत आहे. मी आंदोलनात गेले कारण माझं हेतू फक्त शेतकऱयांना न्याय मिळावा हा होता. असं म्हणत त्यांनी कंगनाला सल्ला ही दिला होता.