कंगना रणावतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती घोडेस्वारीचा मनसोक्त आनंद घेताना दिसते आहे. रविवारच्या सुटीचा आनंद म्हणून तिने बराचवेळ घोडेस्वारी केली. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्या तिने याचे कारण देखल सांगितले आहे.
View this post on Instagram
जयललिता यांचा बयोपिक असलेल्या “थलायवी’साठी कंगणाने खूप वजन वाढवलेले होते. मात्र आता वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच बऱ्याच दिवसांनी घोडेस्वारी करायला गेले होते, असे कंगणाने म्हटले आहे. घोडा हो असा प्राणी आहे की त्याच्याबरोबर आपले ट्युनिंग जुळणे खूप आनंददायी असते.
View this post on Instagram
घोडा बोलू शकत नाही मात्र त्याच्या वर्तनातून ते स्वाभाविकपणे लक्षात येते. मला याचाच खूप जास्त आनंद असल्याचे कंगणाने म्हटले आहे. तिच्या या घोडेस्वारीच्या व्हिडीओवर तिच्या फॅन्सनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
इतकी चांगली घोडेस्वारी करते, तर मग “मणिकर्णिका’मध्ये खोट्या घोड्यावर का बसली होती, असा प्रश्न अनेक जणांनी तिला विचारला आहे. “मणिकर्णिका’च्या आगोदर जर घोडेस्वारी शिकून घेतली असती तर चेष्टा तरी झाली नसती, असेही एकाने म्हटले आहे.