टिव्ही ऍक्टर काम्या पंजाबी आणि तिचा बॉयफ्रेंड शलभ डांग यांचे आज वाजत गाजत शुभमंगल झाले. गेल्याच आठवड्यात या दोघांचा साखरपुडाही धुमधडाक्यात झाला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. लग्नाच्या पेहरावामध्ये काम्या खूपच गोड दिसते आहे. काम्या सध्या “शक्ती अस्तित्व के एहसास की’ या मालिकेत सासूच्या रोलमध्ये दिसते आहे.
मालिकेत जरी सासूची भूमिका ती करत असली, तरी प्रत्यक्षात ती आताच बहू झाली आहे. काम्या आणि शलभ दोघेही पंजाबी असल्यामुळे त्यांचा विवाहही पंजाबी पद्धतीने पार पडला आहे. त्यांच्या विवाह समारंभाला बॉलिवूड आणि टिव्ही एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. काम्याचे पहिले लग्न बिजनेसमन बंटी नेगीबरोबर झाले होते. मात्र लग्नानंतर 10 वर्षांच्या संसारानंतर 2013 मध्ये काम्याने घटस्फोट घेतला होता. त्यांची मुलगी आरा काम्याच्या बरोबरच रहाते आहे. शलभ डांगचेही हे दुसरे लग्न आहे. त्यालाही 10 वर्षांचा मुलगा आहे. आता हे दोघेही आपापल्या मुलांसह एकत्र नव्या संसाराला सुरुवात करणार आहेत.