माऊंट मोनगानुई : भारत-न्यूझीलंड दरम्यान तिसरा व अखेरचा सामना आज होत आहे. न्यूझीलंडने मालिकेतील दोन सामने जिंकले असून त्यांची विजयाची हॅटट्रिक रोखण्यांच भारतासमोर आव्हान असणार आहे. आजच्या सामन्यात न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनने टाॅस जिंकून गोलंदाजी स्विकारताना भारतीय संघास फलंदाजीस पाचरण केले आहे.
सलग दोन सामने गमावल्यानंतर तिसरा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा व व्हाईटवाॅश टाळण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. भारतीय संघाने तिस-या सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे. केदार जाधव ऐवजी मनीष पांडेला संघात स्थान मिळालं आहे.
3rd ODI. India XI: P Shaw, M Agarwal, V Kohli, S Iyer, KL Rahul, M Pandey, R Jadeja, S Thakur, N Saini, Y Chahal, J Bumrah https://t.co/Y0xJSkwIYk #NZvInd
— BCCI (@BCCI) February 11, 2020
भारतीय संघ : पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शारदुल ठाकुर, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह.
दुसरीकडे केन विल्यमसनने दुखापतीनंतर संघात पुनरागमन केलं आहे. टाॅम ब्लंडेलला संघातून वगळण्यात आलं आहे. मार्क चैपमैनच्या जागी मिचेल सॅटनरला संधी देण्यात आहे.
3rd ODI. New Zealand XI: M Guptill, H Nicholls, K Williamson, R Taylor, T Latham, J Neesham, C de Grandhomme, M Santner, T Southee, K Jamieson, H Bennett https://t.co/Y0xJSkwIYk #NZvInd
— BCCI (@BCCI) February 11, 2020
न्यूजीलंड संघ : मार्टिन गप्टिल , हेनरी निकोल्स, केन विलियमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लैथम, जेम्स नीशम, कॉलिन डि ग्रैंडहोम, मिचेल सैंटनर, टिम साउदी, काइले जेमीसन, हैमिश बैनेट.