कोळकी (वार्ताहर) – कलारंग महोत्सवामुळे फलटण तालुक्यातील नवोदित कलाकारांना संधी मिळत असून सांस्कृतिक वैभवातही भर पडत आहे, असे गौरवोद्गार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काढले.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनात कलारंग संस्था व ज्योतिचंद भाईचंद सराफ यांच्यावतीने झालेल्या कलारंग महोत्सवात ते बोलत होते. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ चित्रकार सुरेश लोणकर, पत्रकार प्रा. रमेश आढाव, मराठा महासंघाचे नानासाहेब पवार, कलारंगचे प्रमुख संदीपकुमार जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कलारंग जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ गायिका श्रीमती गिरीजाताई बडोदेकर यांना तर कलारत्न पुरस्कार पुणे येथील युवा चित्रकार प्रा. धनश्री लोणकर यांना देण्यात आला. “कलारंग’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सोलापूरचे चित्रकार विकास गोसावी, निशा जैन, रेश्मा कासट, पुण्याचे चित्रकार प्रेम माने, फलटणचे चित्रकार रितेश जगताप यांच्या चित्रांचे प्रदर्शन झाले.
लायन्स क्लब व कलारंग यांच्यावतीने चित्रकला व नृत्यकला स्पर्धा झाली. निकाल पुढीलप्रमाणे – चित्रकला – बाल गट : आद्या पोटे (प्रथम), जीविका दोशी (द्वितीय), देव शिरसट (तृतीय), छोटा गट : जागृती कुंभार (प्रथम), प्रिया काकडे (द्वितीय), अनुज अब्दागिरे (तृतीय), मोठा गट : रितेश जगताप (प्रथम), सृष्टी शिरसट (द्वितीय), रश्मी निषाद (तृतीय), नृत्य – छोटा गट : श्रावणी पवार (प्रथम), श्रेया पर्वत (द्वितीय), मानवी सकट (तृतीय), मोठा गट : गायत्री कुंभार (प्रथम), अथर्व टेके (द्वितीय), काजल मठपती (तृतीय), ड्युएट : पायल व श्रृती कांबळे (प्रथम), गायत्री कुंभार व काजल मठपती (द्वितीय), आदित्य यमपुरे व आर्यन धोत्रे (तृतीय), समूह नृत्य : गॅलक्सी ग्रुप (प्रथम).
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अविनाश चव्हाण, सुशांत चोरमले, आशुतोष कुलकर्णी, हेमंत जाधव, नीलेश चव्हाण, किरण शेवते, दीपिका झाड, उषा राऊत, प्रज्वल नाळे, जितू कुंभार, शैलेश खरात, गणेश नांदले, निखिल येवले, योगेश धुमाळ, प्रशांत भोसले यांनी परिश्रम घेतले. श्रीराम एज्यूकेशन सोसायटी, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल, संतकृपा दूध डेअरी, शांतिकाका सराफ, दृष्टी आय केअर सेंटर, अक्षता मंगल कार्यालय यांचे सहकार्य लाभले. प्रा. धनश्री लोणकर यांना पुरस्कार देताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, शेजारी सुरेश लोणकर, प्रा. रमेश आढाव, संदीपकुमार जाधव व इतर.