करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर चित्रपटगृह बंद करण्यात आले. या काळात अनेक कलाकारांनी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे आपला मोर्चा वळविला आहे. यात बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचाही समावेश आहे. या यादीत आता अभिनेत्री काजोलचे नाव नोंद होणार आहे.
अभिनेत्री काजोल लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. सध्या ती आपल्या “त्रिभंग’ या चित्रपटात व्यस्त असून नुकताच तिने आपल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करत त्याबद्दलची माहिती तिने आपल्या फॅन्सला दिली. रेणुका शहाणे “त्रिभंग’चे दिग्दर्शन करत आहे, तर चित्रपटात काजोल मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
“त्रिभंग’मध्ये मिथिला पालकर, तन्वी आझमी आणि आणि कुणाल रॉय कपूर हेदेखील मुख्य भूमिकांमध्ये दिसतील. हा चित्रपट 15 जानेवारीला नेटफिक्सवर रिलीज होणार आहे. काजोलचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारा हा पहिलाच चित्रपट आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ती ओडिसी डान्सरच्या रोलमध्ये दिसणार आहे.
या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान काजोल, मिथिला पालकर आणि तन्वी आझमी या तिघींनी रेणुका शहाणेबरोबर खूपच धम्माल मस्ती केली. या चित्रपटात उलगडताना दिसणार आहे. अशाप्रकारचा रोल काजोलने यापूर्वी कधीच केलेला नव्हता. त्रिभंगची निर्मिती अजय देवगणने केली असल्यामुळे या चित्रपटाकडून काजोलला विशेष अपेक्षा आहेत.