मुंबई – अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इब्राहिम मोठ्या पडद्यावर लॉन्च करण्याची जबाबदारी करण जोहरने उचलली आहे. इब्राहिमच्या पहिल्या चित्रपटाबद्दल फारशी माहिती समोर आली नसली तरी चित्रपटाचे नाव ‘सरजमीन’ ठेवण्यात आले आहे. बोमन इराणी यांचा मुलगा कयोज इराणीही या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटासाठी करण जोहरने त्याची आवडती आणि लाडकी काजोलशी संपर्क साधला आहे.
रिपोर्टनुसार, करण जोहरच्या ऑफिसमधून काजोलला संपर्क करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या चित्रपटात इब्राहिमच्या विरोधात एकही नायिका दिसणार नाही. पण ‘सरजमीन’मधली काजोलची व्यक्तिरेखा खूपच दमदार असणार असल्याचे समजते. चित्रपटाशी संबंधित सूत्राने इब्राहिम अली खानबद्दलही बोलले आहे. त्यात म्हटले आहे, ‘इब्राहिम खूप छान टॅलेंटेड आहे. चित्रपट व्यवसायात तो अजूनही नवीन आहे, त्यामुळे त्याच्याकडे खूप काही शिकण्यासारखे आहे. चांगली गोष्ट म्हणजे त्याच्याकडे अजिबात एटिट्यूड नाही. इतर न्यूकमर्स सारखा त्याने कधीही जास्त स्मार्टनेस दाखवला नाही. तो मेहनती आहे आणि हुशारीने काम करतो.
इब्राहिमला चित्रपटाच्या सेटवर पाहून असे वाटते की, तो २० वर्षांपूर्वीचा सैफ अली खान आहे. त्याची शैली त्याच्या वडिलांशी मिळतेजुळते आहे. यापूर्वी, इब्राहिमची बहीण आणि अभिनेत्री सारा अली खानने पुष्टी केली होती की तिचा भाऊ चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. इब्राहिमने अलीकडेच त्याच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्याचेही साराने सांगितले होते. ‘सरजमीन’ पुढील वर्षापर्यंत पूर्ण होणार असल्याचे समजते.