भोपाळ – मध्य प्रदेशात २८ जागांसाठी पोट निवडणुका होणार असून यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या -समवेत समर्थक आमदारांनीही काँग्रेसचा हात सोडल्याने कमलनाथ सरकारला पायउतार व्हावं लागलं होत. अशातच आज ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांनी केलेल्या विखारी टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिल आहे.
एका प्रचारसभेत बोलताना शिंदे यांनी, “कमलनाथजी आपण म्हणालात की मी कुत्रा आहे. होय, कमलनाथजी मी कुत्रा आहे. मात्र माझा मालक माझी जनता आहे. होय, मी कुत्रा आहे कारण कुत्रा आपल्या मालकाप्रती इमानदार असतो. कारण जर का कोणताही व्यक्ती माझ्या मालकाकडे बोट दाखवेल, मालकाशी भ्रष्टाचार व त्याला नुकसान होईल असं धोरण दाखवेल. तर हे कुत्रं त्या व्यक्तीला चावल्याशिवाय राहणार नाही. होय मी कुत्रा आहे. मला अभिममान आहे की मी माझ्या जनतेचं कुत्रं आहे.” असं वक्तव्य केलं.
#WATCH: Kamal Nath ji calls me a dog, yes I am a dog because I am a servant of the people… because a dog protects its owner and if someone brings corrupt and ill-intended policies then this dog will attack that person: BJP leader Jyotiraditya Scindia #MadhyaPradesh pic.twitter.com/UyY4xQHdZl
— ANI (@ANI) October 31, 2020
तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने शुक्रवारी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते कमल नाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा रद्द केला. निवडणूक आचारसंहितेचा वारंवार भंग करत असल्याचा ठपका ठेवत आयोगाने ती कारवाई केली.
मध्यप्रदेशात सध्या विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठीच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण तापले आहे. प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग केला जात असल्याच्या विविध तक्रारी समोर येत आहेत.
अशातच नाथ यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणुकीच्या काळात स्टार प्रचारकावरील खर्च संबंधित पक्षाच्या खात्यात जमा होतो. मात्र, तो दर्जा गमावल्याने नाथ यांनी प्रचारावेळी केलेला प्रवास, मुक्काम आदींवरील खर्चाचा भार कॉंग्रेसच्या उमेदवाराला उचलावा लागणार आहे.