साउथ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा उद्या (20 मे) वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी त्याने सर्व चाहत्यांना घरातच बसून बर्थडे साजरा करण्याचे आवाहन कले आहे. यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
यात म्हटले आहे की, सध्या संपूर्ण देश एका संकटाविरोधात लढा देत आहे. यात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी फ्रंटलायन वॉरियरप्रमाणे संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत माझ्या वाढदिवशी गर्दी न करता करोना संसर्गाविरोधातील लढाईत साथ द्या, असे आवाहन त्याने केले आहे.
ज्युनियर एनटीआर म्हणाला, माझ्या चाहत्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपले संदेश, व्हिडिओ आणि शुभेच्छा मी स्वीकारल्या आहेत. आपल्या आशीर्वादामुळेच मी आतापर्यंतचा प्रवास करू शकलो. मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. तसेच मला आशा आहे की, माझी करोना टेस्ट लवकरच निगेटिव्ह येईल, असे त्याने म्हटले आहे.