Amit Shah Visit Maharashtra। भाजप नेते तथा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शाह यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अमित शाह हे 4 आणि 5 मार्च रोजी संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शाह आपल्या या दौऱ्यात अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे.
अमित शाह आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात 5 मार्च रोजी अकोला येथे क्लस्टरच्या बैठकीला हजर राहणार, तसेच जळगावमध्ये युवासंमेलनाला उपस्थित राहणार आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर शहरात शाह यांची जाहीर सभा देखील होणार आहे. गेल्या आठवड्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखीलयवतमाळ जिल्ह्याच्या दौरा केला होता.
अमित शाहांचा कसा असणार दौरा ? Amit Shah Visit Maharashtra ।
- सोमवार 4 मार्च रोजी रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन होणार
- त्यानंतर ते हॉटेल राम इंटरनॅशनलकडे रवाना व मुक्काम करतील.
- दुसऱ्या दिवशी 5 मार्च रोजी सकाळी 10. 35 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने अकोलाकडे रवाना होतील.
- अकोला व जळगाव येथील कार्यक्रम आटोपून सायंकाळी 5.40 मिनिटांनी पुन्हा छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे हेलिकॉप्टरने रवाना होणार.
- सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथून मोटारीने क्रांती चौककडे प्रयाण करतील.
- क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण, तेथून मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान, खडकेश्वरकडे प्रयाण करतील.
- सायंकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी सभेला संबोधित करणार.
- सायंकाळी 7.30 मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरुन मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण.
- सायंकाळी 7.45 मिनिटांनी विमानाने मुंबईकडे रवाना होतील.
विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार Amit Shah Visit Maharashtra।
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम-यवतमाळ आणि बुलढाणा या चार आणि चंद्रपुर, वर्धा या लोकसभा मतदारसंघाचा आढावा ते घेणार आहे. या जिल्ह्यातील एकत्रित 400 भाजप पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत सवांद साधणार आहे. त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा:
नफे सिंग राठी हत्याकांडात पोलिसांना मोठं यश; गोव्यातून दोन शूटर्स अटक
Sanjay Raut | संजय राऊतांचा शिखर बँक घोटाळा प्रकरणावरून फडणविसांवर हल्लाबोल; म्हणाले…