जगभरात सर्वत्र खूप नाव कमावलेला टॉड फिलीपचा “जोकर” हा हॉलीवूडपट भारतात आणखी एकदा रिलीज केला जाणार आहे. वॉर्नर ब्रदर्सचे प्रॉडक्शन असलेला “जोकर” 14 फेब्रुवारीला भारतभर दुसऱ्यांदा रिलीज केला जाणार आहे.
View this post on Instagram
बॅटमॅनचा अगदी कट्टर शत्रू असलेल्या जोकरचा उदय, महत्वाकांक्षा आणि स्टॅन्ड अप कॉमेडीमधून केलेला येडेपणा या सिनेमात दाखवला असेल. जॅक्वीन फिलीप हा यामध्ये जोकरची विनोदी आणि खलनायकी भूमिका साकारतो आहे.
याच सिनेमातून जॅक्वीनला जोकरचा रोल कायमस्वरूपी मिळाला होता. त्याने या रोलला अशा पद्धतीने रंगवले की खलनायक हा विनोदी असू शकतो, हा अशक्य वाटणारा भ्रम दूर झाला. त्याच्या या रोलला गोल्डन ग्लोब, एसएजी ऍवॉर्ड आणि ऍकेडमी ऍवॉर्डचे नॉमिनेशनही मिळाले होते.
“जोकर”ला ऑस्करची 11 नॉमिनेशन मिळाली होती. तर “जोकर” 1 अब्ज डॉलरचा धंदा करणारे चौथे कॉमिक टायटल होते. यापूर्वी ऍक्वामॅन (1.15 अब्ज डॉलर), द डार्क नाईट रायजेस (1.084 अब्ज डॉलर) आणि द डार्क नाईक (1.005 अब्ज डॉलर)ची कमाई केली आहे. “जोकर” यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात रिलीज झाला होता. तेंव्हा या सिनेमाने 50 कोटींचा धंदा केला होता.