हॅमिल्टन : भरात असलेल्या भारतीय संघाचा आज न्यूझीलंडशी तिसरा टी-20 सामना होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतलेल्या भारताला आजच्या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
भारतीय संघात श्रेयस अय्यर, मनीष पांडे हे मधल्या फळीतील दोघेही फलंदाज तसेच गोलंदाजही चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाने मागील दोन टी-20 मध्ये विजयी ठरलेला संघच कायम ठेवला आहे.
3rd T20I. India XI: R Sharma, KL Rahul, V Kohli, S Iyer, S Dube, M Pandey, R Jadeja, S Thakur, Y Chahal, M Shami, J Bumrah https://t.co/7O8uUMMnPg #NZvInd
— BCCI (@BCCI) January 29, 2020
भारतीय संघ : रोहित शर्मा, के एल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, मनीष पांडे, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, युज़वेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
दुसरीकडे न्यूझीलंड संघाला सलग दोन पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे न्यूझीलंडने आजच्या सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे. ब्लेयर टिकनरच्या ऐवजी संघात स्काॅट कुग्गलिनला संघात स्थान देण्यात आलं आहे.
3rd T20I. New Zealand XI: M Guptill, C Munro, K Williamson, C de Grandhomme, R Taylor, T Seifert, M Santner, T Southee, S Kuggeleijn, I Sodhi, H Bennett https://t.co/7O8uUMMnPg #NZvInd
— BCCI (@BCCI) January 29, 2020
न्यूझीलंड संघ : मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, केन विलियमसन, कॉलिन डी ग्रैंडहोम, रॉस टेलर, टिम सीफ़र्ट, मिचेल सैंटनर, स्कॉट कुग्गलिन, टिम साउदी, ईश सोढ़ी, हेमिश बेनेट
दरम्यान, न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका जिंकण्याची भारतीय संघाला प्रथमच संधी मिळणार आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००८-०९ व २०१९ साली अनुक्रमे २-० व २-१ अशी मालिका गमवावी लागली होती. त्याचा वचपा काढण्याची यंदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला मिळाली आहे.