रामबन :- जम्मू-काश्मीरमधील रामबन पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 300 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे.(J&K: Cocaine Worth Rs 300 Cr Seized In Ramban District, 2 Arrested)आरोपींना अटक करून कारागृहात पाठवण्यात आले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
एडीजीपी जम्मू मुकेश सिंग यांनी सांगितले की, रामबन पोलिसांनी रेल्वे चौक बनिहाल येथे एक वाहन थांबवले आणि सुमारे 30 किलो कोकेन जप्त केले, ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 300 कोटी रुपये आहे आणि दोघांना अटक केली. पीएस बनिहाल येथे एनडीपीएस कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.