वाढदिवसीच आव्हाड यांनी अण्णांचा काढला चिमटा; म्हणाले…यासाठी नाही तर वादिवसाच्या…

मुंबई – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. अण्णांवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चांगलाच टिमटा काढल्याचे बघायला मिळाले आहे.

जितेंद्र आव्हाड अण्णांना शुभेच्छा देताना म्हणाले की, ”प्रिय अण्णा…., प्रचंड महागाई ,पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव,ढासळती अर्थव्यवस्था,कोरोना मुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था,वाढती सामाजिक दरी,चीन सोबत सीमेवरील तणाव ह्यांच्या बद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता.”

मागील पाच वर्षांच्या काळात मोदी सरकारवर सातत्याने टीका करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता भलतीच मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. सौम्य टीका आणि अन्य कामाचे कौतूक, असे हजारे यांचे धोरण राहिल्याचे दिसून आले आहे. यावरून आव्हाड यांनी वाढदिवसाच्या दिवशीच अण्णांना लक्ष केले आहे.

समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या चाळीस वर्षांत २० वेळा विविध प्रश्नांवर तसेच सर्वच पक्षांच्या विरोधात छोटी मोठी अनेक आंदोलने आहेत. तुलनेने कॉंग्रेसची सत्ता असताना अण्णांनी देशात अनेक आंदोलने केली आहे. मात्र भाजप सरकारच्या काळात अण्णांनी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. यावरून अनेकदा अण्णांवर टीका सुद्धा होताना दिसून येत आहे.

देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे, पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. यासह अर्थव्यवस्था कोलमोडली आहे. आरोग्यसुविधांचा बोजावारा वाजला आहे. अशा अनेक समस्या देशात निर्माण झाल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.