पुणे – भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले एक विधान सध्या चर्चेत आले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले, आपला कुठलाही देव बॅचलर नाही आपले कुठलेही महापुरूष बॅचलर नाहीत. संसार करून सगळं करता येतं. सेवाही करता येते.जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याचं रक्त हिरवं किंवा निळं आहे. देवाने माणसाला घडवताना कुठलाही भेद केला नाही. सगळ्यांना सारखंच बनवून पाठवलं. सगळ्यांना दोन कान, दोन डोळे आणि समान शरीर देवाने दिलं आहे.’ त्यांच्या या विधानावर आता विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे.
आपला एकही देव बॅचलर नाही असं चंद्रकांत दादांनी म्हणताच इंद्रलोकात भुवया उंचावल्या व सगळयांनी मारुतीकडे बघायला सुरुवात केली व मारुतीला चंद्रकांत दादांचं म्हणणं ऐकवलं. मारूतीने निर्णय घेतला आहे, कि लवकरच चंद्रकांत दादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत कि नाही ह्यावर सविस्तर चर्चा करणार.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 13, 2023
अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड ट्विट करत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. आव्हाड यांनी ट्विट केले आहे की,’आपला एकही देव बॅचलर नाही असं चंद्रकांत दादांनी म्हणताच इंद्रलोकात भुवया उंचावल्या व सगळयांनी मारुतीकडे बघायला सुरुवात केली व मारुतीला चंद्रकांत दादांचं म्हणणं ऐकवलं. मारूतीने निर्णय घेतला आहे, कि लवकरच चंद्रकांत दादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत कि नाही ह्यावर सविस्तर चर्चा करणार. ते ट्विटमध्ये पुढे लिहितात की, संसार करून पण सगळं करता येतं असं महापुरुष व देवांना उद्देशून चंद्रकांत दादांनी म्हटलं आहे. त्यावर आता रामदास स्वामी काय उत्तर देतात ह्यावर आता सगळ्यांच्या नजारा लागल्या आहेत.’ असं ट्विट करत आव्हाड यांनी टोला लगावला आहे.
दरम्यान, युवा संवाद कार्यक्रमांमध्ये बोलताना पाटील म्हणाले, ‘तुम्हाला मंदिरात जायला योग्य वाटतं त्या मंदिरात जा. तुम्हाला मस्जिदमध्ये नमाज पठण करायचं असेल तर ते करा. आमचा विरोध नाही. हिंदू हा शब्द पूजेशी जोडला गेलेला नाही. हिंदू हा शब्द एक गुण वाचक आहे. आपल्या देशावर किती आक्रमण झाली. अनेक मुस्लिम लोक आले.ते लुटायला आले. इंग्रज आले, डच आले, आपल्याला काय फरक पडला? आपला धर्म बुडाला का? छत्रपती संभाजी महाराज यांचे देखील हाल केले. पण त्यांनी देखील आपला धर्म सोडला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला धर्म वाचवला नाहीतर सगळ्यांची सुंता झाली असती.’ असेही ते म्हणाले होते.