मुंबई – टीव्ही जगतात सर्वाधिक टीआरपी असलेला शो म्हणून हिंदी ‘बिग बॉस’कडे पाहिले जाते. अभिनेता सलमान खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. सध्याचा ‘बिग बॉस 16’चा सिझन पहिल्याच दिवसापासून वादळी ठरत आला आहे. यंदाचा सीजन अनेक कारणांमुळे चर्चेत ठरला आहे. घरातील भांडण असो व स्पर्धकांमधील मैत्रीचं नातं हे सगळंच प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन करत आहे. मात्र, या आठवड्यामध्ये घरातील काही महत्वाचे सदस्य घराबाहेर पडणार आहेत.
या आठवड्यामध्ये नाॅमिनेशनमध्ये ‘निम्रत काैर, श्रीजिता डे, एमसी स्टॅन’ आहेत. त्यामुळे नेमकं कोण घराबाहेर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावर देखील अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. या आठवड्यामध्ये श्रीजिता डे घराबाहेर पडणार असल्याचे सांगितले जातंय.
फक्त श्रीजिता डे हिच नाहीतर साजिद खान आणि अब्दु देखील बिग बाॅसच्या घराबाहेर पडणार असल्याच सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे साजिद खान आणि अब्दु बिग बाॅसबाहेर पडले तर त्यांच्या चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का असणार आहे. ‘बिग बॉस 16’ मध्ये ‘शिव ठाकरे, साजिद खान, एमसी स्टॅन, अब्दु रोजिक, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर’ यांची मैत्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. घरातील टास्क आणि भांडणांमध्ये सुद्धा यांच्या मैत्रीची झलक पाहायला मिळाली आहे.