नवी दिल्ली – मनुष्याने “करावे तसे भरावे ” हि म्हण नेहमी डोळ्यापुढे ठेऊन वागावे कारण, आपल्या कर्माप्रमाणे देव नेहमीच आपल्याला फळ देत असतो. असं आपण सर्वांनी अनेकदा ऐकले आहे. असेच काहीसे आंध्र प्रदेशातील एका चोरा सोबत घडेल आहे.
A burglar trapped in the act at Jhadupudi Jami Yellamma #Temple in Kanchili mandal of Srikakulam dist. Enters through a small ventilation window, but just couldn’t get out.#AndhraPradesh #Kanchili #Jhadupudi #Srikakulam #Burglar #Funny #JamiYellammaTemple pic.twitter.com/XF6SGG9LYI
— Surya Reddy (@jsuryareddy) April 5, 2022
आंध्र प्रदेशात एका व्यक्तीने दारूची एक बॉटल विकत घेण्यासाठी मंदिरातील दागिने आणि पैसे चोरी करण्याचे ठरवले मात्र त्याच्या कर्मानुसार त्याला देवाने फळ दिले आहे. त्याने दागिने आणि पैसे चोरी करण्यासाठी मंदिराच्या भिंतीला छिद्र पाडलं. त्याने आत जाऊन देवाचे दागिने चोरले. मात्र दागिने चोरुन पुन्हा त्याच भगदाडमधून बाहेर पडत पळण्याच्या प्रयत्नात असताना मात्र त्याची फजिती झाली.
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील घटना आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलममधील कांचिली मंडलातील जादुपुडी गावात घडली. व्हिडिओतील चोरचे नाव पापा राव असून त्याने मंदिरातील नऊ ग्रॅम चांदी चोरली होती. मंदिरात घुसण्यासाठी त्याने भिंतीला छिद्र पाडलं होतं. चोरी करुन परतत असताना तो भगदाडमध्ये अडकला.’
दरम्यान, सकाळी मंदिर उघडल्यावर पुजार्याने त्याला मंदिराच्या भिंतीला केलेल्या बिळात अडकलेले पाहिले यानंतर त्याने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी चोरट्याला बाहेर काढलं आणि घटनेबाबत एफआयआर दाखल केली. सध्या हा व्हिडिओ सोशलव चांगलाच व्हायरल झाला असून युजर्स सुद्धा “करावे तसे भरावे ” म्हणत कंमेंट्स करत आहे.