Jaya Prada । भाजपच्या माजी खासदार आणि सिने अभिनेत्री जयाप्रदा यांना आचारसंहिता भंगाच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने फरार घोषित केले आहे. वारंवार नोटीस पाठवूनही जयाप्रदा सुनावणीला उपस्थित राहिल्या नाहीत. । Jaya Prada
त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट देखील बजावण्यात आले आहे. त्यानंतरही सुनावणीला उपस्थित न राहिल्यामुळे रामपूर जिल्ह्याच्या खासदार, आमदारांच्या विशेष न्यायालयाने जयाप्रदा यांना फरार घोषित केले आहे.
२०१९ च्या निवडणुकीच्यावेळी जयाप्रदा यांच्याविरोधात रामपूरच्या दोन पोलीस स्थानकांमध्ये आचारसंहिता भंगाची दोन प्रकरणे दाखल झाली होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले होते. । Jaya Prada
त्यांचा ठापठिकाणा लागत नसून त्यांचा फोन देखील नेहमी बंद असतो, असे पोलीस महानिरीक्षकांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर जयाप्रदा यांना फरार घोषित केले गेले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ मार्च रोजी होणार आहे. जयाप्रदा यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तयार करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षकांनी दिले आहेत.