Jaya Bachchan : अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) अभिनयासह त्यांच्या कडक स्वभावामुळे देखील ओळखल्या जातात. अनेकदा विविध कार्यक्रमाला जाताना त्या पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होतात. मात्र त्या पापाराझींवर (Paparazzi) चिडलेल्या दिसतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्या पुन्हा एकदा पापाराझींवर संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. परंतु त्यांच्या या वागण्यावरून नेटकऱ्यांनी जया बच्चन यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
या व्हिडिओत पापाराझी जया बच्चन यांना फोटोसाठी हाक मारताना दिसत आहेत. त्यांचा आवाज ऐकून जया बच्चन यांनी कानावर हात ठेवल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर “ओरडू नका” असं म्हणत त्यांनी सगळ्यांसमोरच पापाराझींना दम दिल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांना पुन्हा ट्रोल केलं आहे. “मीडियाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तरच त्यांना त्याची किंमत कळेल,” “अमिताभ सर यांना कसं सांभाळत असतील”, “यांना पाहून मला शाळेतील मुख्याध्यापकांची आठवण येते,” असं म्हणत जया बच्चन यांना ट्रोल केलं आहे.
View this post on Instagram
यापूर्वीही अशाच एका व्हिडीओमध्ये जया बच्चन पापाराझींवर ओरडत “मी बहिरी नाही” असं म्हणताना दिसल्या होत्या. त्यांची ही कृती पाहून सोशल मीडियावर त्यांन ट्रोल करण्यात आले होते. दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात आलिया आणि रणवीर यांच्यासोबतच जया बच्चन देखील मुख्य भूमिकेत होत्या याशिवाय धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार देखील या चित्रपटात पाहायला मिळाले.