टोकीयो : डायमंड प्रिन्सेस या जहाजावरील सर्व कर्मचारी आणि प्रवाशांना जपानच्या आरोग्य मंत्रालयाने दोन हजार आयफोन वाटण्याचा निर्णय घेतला आहे.
या आयफोनमध्ये एक ऍप असून त्या द्वारे औषधांची गरज, डॉक्टरांची नियोजित भेट, मानसोपचार तज्ज्ञांशी मसलत अशा सोयी आहेत.
वैद्यकीय मदत मागण्यासाठी लाईन ऍप कसे वापरावे याचे मार्गदर्शक पत्रिकाही या आयफोन सोबत देण्यात आली आहे. जपान बाहेरील ऍप असल्याने ते अनेकांच्या ऍड्रॉईड फोनवर हे ऍप डाऊनलोड करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे हे आय फोन देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.