नवी दिल्ली : कमलनाथ सरकारमधील मंत्री सज्जनसिंग वर्मा यांनी प्रियांका गांधी यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेवर पाठवावे अशी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी सोमवारी एक ट्विट केले आहे. वर्मा यांनी ट्विटमध्ये लिहले आहे कि, ‘इंदिरा गांधी अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांच्या उत्कर्षासाठी वचनबद्ध होत्या. प्रियांका गांधी इंदिरा गांधींच्या पाऊलावर चालत आहेत.
इंदिरा गांधी जी अनुसूचित जाति जनजाति एवं महिला वर्ग के उत्थान के लिए प्रतिबद्ध थी उन्हीं के पद चिन्हों पर प्रियंका जी चल रही हैं। जिस तरह इंदिरा जी @OfficeOfKNath को मध्यप्रदेश लाई थी उसी तरह अब @priyankagandhi जी को प्रदेश से राज्यसभा में लाने का वक्त आ गया है।@RahulGandhi pic.twitter.com/acofBpyYpR
— Sajjan Singh Verma (@sajjanvermaINC) February 17, 2020
प्रियांका गांधी यांना मध्यप्रदेशातून राज्यसभेत पाठवण्याची वेळ आली आहे. हे ट्विट वर्मा यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाही टॅग केले आहे.
या ट्विटमध्ये वर्मा यांनी एका फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये इंदिरा गांधी आणि प्रियंका गांधी दिसत आहेत. यात प्रियंका गांधी आपल्या आजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसत आहे.
यावर्षी मध्य प्रदेशात राज्यसभेच्या तीन जागा रिक्त होणार आहेत. कॉंग्रेसचे दिग्विजय सिंग, भाजपचे प्रभात झा आणि सत्यनारायण जटिया यांचा कार्यकाळ यावर्षी समाप्त होत आहे.