टोकिओ – मॉडर्नी कंपनीच्या कोविड-19 विरोधी लसीमध्ये जंतुसंसर्ग झाल्यामुळे जपानने आणखीन 10 लाख डोस वापरातून मागे घेतले आहेत. या लसीच्या आणखीन बॅचमध्येही संसर्ग झाल्याचे आढळले होते. तसेच ही लस घेतलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे जपान सरकारने 10 लाख डोस मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जपानने मॉडर्ना कंपनीच्या लसीचे आतापर्यंत 26 लाख डोस वापरातून मागे घेतले आहेत. जपानमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढायला लागले असतानाच एवढ्या मोठ्या संख्येने लसीचे डोस मागे घेतले गेले आहेत. त्यामुळे कोविड विरोधी लसीकरणाला मोओठा धक्का बसला असल्याचे मानले जाते आहे.
लस दूषित झाल्याचे ताजे अहवाल टोकियोजवळील गुन्मा आणि दक्षिणेकडील प्रांत ओकिनावा प्रांतातून आले आहेत. गेल्या आठवड्यात आधीच काढलेल्या 1.63 दशलक्ष डोस व्यतिरिक्त आणखी दोन बॅचमधील लसी देखील रविवारी मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. गुन्मा येथील मॉडर्ना लसीच्या कुपीमध्ये एक लहान काळा पदार्थ सापडला. ओकिनावामध्ये सिरिंज आणि एका कुपीमध्ये काळे पदार्थ दिसले आणि एका वेगळ्या सिरिंजमध्ये गुलाबी रंगाचे पदार्थ सापडले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सुया चुकीच्या पद्धतीने कुपीमध्ये घातल्या गेल्या असतील. त्यामुळे या लसी दूषित झाल्या असतील, जपानच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. मात्र या बॅचमधील इतर कुपी वापरणे सुरू ठेवता येईल, असे मंत्रालयाने सोमवारी सांगितले.