हवाई सरावादरम्यान जपानचे लढाऊ विमान बेपत्त्ता

टोकियो – उत्तर जपानमधील मिसवा येथील हवाई तळावरून उड्डाण केलेले एक लढाऊ विमान नियमित सरावादरम्यान बेपत्ता झाले आहे. मिसवा पासून सुमारे 135 किलोमीटरवर असताना जपानच्या सशस्त्र दलातील “एफ-35′ विमान रडारवरून दिसेनासे झाले. हे विमान बेपत्ता झाले असल्याचे संध्याकाळी 7 च्या सुमारास जाहीर करण्यात आले. या विमानामध्ये केवळ एकच वैमानिक आहे. जपानच्या “सेल्फ डिफेन्स फोर्सेस’कडून या बेपत्ता विमानाचा शोध घेतला जात आहे. जपानकडे एकूण 12 “एफ-35′ विमाने आहेत. ही संख्या फारच मर्यादित असल्याने 150 विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे. बेपत्ता झालेले विमान अपघातग्रस्त झाल्याच्या संशयावरून सागरी टेहळणी पथकातील विमानांमधूनही शोध घेतला जात आहे. याशिवाय दोन सागरी टेहळणी नौकांमधूनही बेपत्ता विमानाचा शोध घेतला जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.