मुंबई – बॉलिवूड अभिनेता जान्हवी कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामासोबतच ही अभिनेत्री तिच्या बोल्ड इमेजसाठीही खूप चर्चेत असते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ माजवत असते. जान्हवीचे चाहते तिच्या नवीन पोस्ट्सची आतुरतेने वाट पाहत असतात.
अश्यातच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, यामध्ये तिरुपती बालाजीच्या मंदिरात असल्याचं दिसत आहे. सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अभिनेत्री सध्या हैदराबादमध्ये तिच्या आगामी ‘देवरा’ या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या शूटिंगमधून वेळ काढत ती श्री व्यंकटेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचली आहे.
#WATCH | Andhra Pradesh | Actress Janhvi Kapoor visits Sri Venkateswara Swami Temple in Tirumala to offer prayers. pic.twitter.com/zbOHYkcBfH
— ANI (@ANI) August 28, 2023
तिने तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले आहे. दरवर्षी हजारो भाविक या मंदिरात येत असतात. जान्हवी कपूर या मंदिरात पारंपारिक पेहरात गेली होती. बिना मेकअप लूक आणि पारंपारिक पेहरावाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जान्हवीने तिच्या टीमसोबत तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले आहे.
जान्हवी कपूर श्री व्यंकटेश्वर मंदिरात आल्याचे चाहत्यांना कळताच त्यांनी मंदिर परिसरात लाडक्या अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या पारंपारिक लूक मध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती.