काल हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली.या सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे. चांद्रयान चंद्रावरती उतरलं, याचं मी कौतुक करतो. मात्र काही लोक या मोहिमेचा गैरफायदा घेताना दिसत आहे. आता निवडणुका जवळ येत आहे. तर काही लोक म्हणतील की, 2030 पर्यंत मी तुम्हाला चंद्रावर घर देईल. परंतु, तुम्ही यावर विश्वास ठेवू नका. चंद्र दूरच राहिला तुम्हाला तुमचं शेतातलं घर गहाण ठेवावं लागेल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.