फिल्मी दुनियेतून थोडा ब्रेक घेऊन उर्मिला मातोंडकरने थोडे दिवस राजकारणात घालवले आहेत आणि आता ती पुन्हा एकदा सिनेसृष्टीमध्ये उतरणार आहे. तिने एक प्रोजेक्ट स्वीकारला आहे. पण तो जरा रखडलेला प्रोजेक्ट आहे.
View this post on Instagram
हा प्रोजेक्ट म्हणजे एक वेबसिरीज आहे. या वेबसिरीजची स्क्रीप्ट उर्मिलाला आवडली होती. शुटिंगचे वेळापत्रकही निश्चित झाले होते. पण गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यातच ही वेबसिरीज रखडली होती. आता काही औपचारिक परवानगी मिळत नसल्यामुळे या वेबसिरीजच्या शुटिंगला अजून सुरुवात झालेली नाही.
View this post on Instagram
आता तर हा प्रोजेक्ट नक्की सुरू होणार की नाही, हे देखील सांगता येणार नाही, असे उर्मिला म्हणाली. जर हा प्रोजेक्ट सुरू झालाच नाही, तर अन्य एखाद्या वेबसिरीज अथवा सिनेमाच्या प्रस्तावाचा विचार करेन. कारण ऍक्टिंग सोडून देण्याचा आपला अजिबात विचार नाही.
View this post on Instagram
जोपर्यंत काही ठोस भूमिका मिळत नाही, तोपर्यंत आपण काही चांगले काम केले असल्यासारखेच वाटत नाही. म्हणूनच थांबले असल्याचे उर्मिलाने सांगितले. मात्र एवढे सगळे सांगितल्यानंतरही तिने आपल्या या रखडलेल्या वेबसिरीजचे नाव आणि अन्य तपशीलाबाबत काहीही माहिती सांगितली नाही.