सांबा/जम्मू :- जम्मू आणि काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून ड्रोनद्वारे सोडण्यात आलेल्या पार्सल मध्ये शस्त्रास्त्रे आणि स्फोटक असल्याचे निष्पन्न झाले असून हा साठा जप्त करण्यात आला आहे असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
राख बरोटिया येथील रेल्वे मार्गाजवळ सोमवारी पहाटे हे पार्सल सापडले. ते ड्रोन मधून टाकण्यात आले होते. त्यात तीन चीन निर्मित पिस्तूले आणि ग्रेनेड होते.
सांबा सेक्टरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरिंदर चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले की, “आम्हाला विजयपूर पट्ट्यातील राख बरोटियाच्या शेतात एक संशयित पॅकेज असल्याची माहिती मिळाली.
आम्ही तात्काळ पोलिस, बॉम्ब निकामी पथक आणि फॉरेंसिक सायन्स लॅबोरेटरी पथके घटनास्थळी रवाना केली. तेथे केलेल्या तपासणीत हा माल आढळून आला. सीमे पलिकडून भारतीय सीमेतील दहशतवाद्यांसाठी ड्रोनद्वारे अशी सामग्री पोचण्याचे प्रकार सातत्याने उघड होत आहेत.