जामखेड (प्रतिनिधी) : शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाची साखळी वेगाने विस्तारली असून आज दिवसभरात कोरोनाचे तब्बल २२ रुग्ण सापडले असून यातील सर्वाधिक रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत तसेच कोरोनमुक्त होण्याच्या प्रमाणात देखील लक्षणीय वाढ झाली आहे.
कोरोना व्हायरस संक्रमणाने जामखेड तालुक्यात थैमान घातले आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढतच चालला आहे. आतापर्यंत तब्बल २०० हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
शहरातील ग्रामीण रुग्णालय अंतर्गत आरोळे हाॅस्पिटल येथे रॅपिड अँटिजेन तपासणी सुरू करण्यात आली आहे. आज दि १५ रोजी केलेल्या ९७ जणांच्या रॅपिड अँटिजेन तपासणीत २२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून ७५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये यामध्ये खर्डा येथे १०, डोळेवाडी येथे एकच कुटुंबातील ६, तेलंगशी १,झिक्री १, नान्नज १ , जामखेड शहरातील शिवाजी नगर १,सदाफुले वस्ती १, आरोळे नगर १ असे एकुण २२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे तालुक्यातील ग्रामीण भागातील असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.