आज 247 रूग्णांना डिस्चार्ज
सातारा (प्रतिनिधी) – क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील प्रयोगशाळेतील अहवालानुसार जिल्ह्यातील 37 संशयितांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर विविध रुग्णालयात आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 247 रुग्णांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. 434 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
करोनाबाधित अहवालामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील भेकवली 1, महाबळेश्वर 13, रांजणवाडी 1, तापोळा 1., कराड तालुक्यात कोळे 1.,
वाई तालुक्यातील कन्हुर 1,
खटाव तालुक्यात गुरसाळे 1.,
कोरेगाव तालुक्यात कोरेगाव 2.,
माण तालुक्यातील म्हसवड 1.,
खंडाळा तालुक्यातील पळशी 3, खंडाळा 2, नायगाव 4, शिरवळ 4.,
जावळी तालुक्यातील नेवेकरवाडी 2 नागरिकांचा समावेश आहे.
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये जावळी तालुक्यातील 1, कराड तालुक्यातील 64, खंडाळा तालुक्यातील 30, खटाव तालुक्यातील 16, कोरेगांव तालुक्यातील 20, महाबळेश्वर तालुक्यातील 1, पाटण तालुक्यातील 7, फलटण तालुक्यातील 29, सातारा तालुक्यातील 28, वाई तालुक्यातील 51 जणांचा समावेश आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 13, कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 12, वाई येथील 44, शिरवळ 40, रायगाव 45, पानमळेवाडी येथील 57, महाबळेश्वर येथील 65, खावली 85, व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 73 अशा एकूण 434 जणांचे नमुने पुणे, सातारा व कराड येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने 35875
एकूण बाधित 7129
घरी सोडण्यात आलेले 3644
मृत्यू 226
उपचारार्थ रुग्ण 3259