जामखेड (प्रतिनिधी) : जामखेड शहरासह तालुक्यात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली असून आज जामखेड शहरात ४ तर ग्रामीण भागात १७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. आजपर्यत जामखेड तालुक्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना बांधितांच्या संख्येमुळे प्रशासन हतबल झाले आहे.
आज जामखेड शहरातील सदाफुले वस्ती १, कोर्ट गल्ली १, राळेभात गल्ली १, तपनेश्वर गल्ली १ तर तालुक्यातील ग्रामीण भागातील खर्डा ३, आनंदवाडी १, झिक्री ५, डोळेवाडी २, पिपळगाव उंडा १, पिंपळगाव आवळा १, साकत २, खूरदैठण १, तेलंगशी १ असे २१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या २५० च्या घरात गेली आहे. एकीकडे प्रशासन कोरोनाचा अटकाव करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असताना नागरिकांचे बेफिरकीचे वागण्यामुळे कोरोनाची संख्या वाढत चालली आहे.