करोनावर एबलसेलेन प्रभावी ठरेल

अमेरिकेतील संशोधकांचा दावा

वॉशिंग्टन – करोना विषाणूंची शरीरातील वाढ रोखण्यासाठी एबलसेलेन हे औषध प्रभावी ठरेल, असा दावा येथील संशोधकांनी केला आहे.

संगणकीय सिमुलेशनद्वारे या संशोधकांनी या औषधाचा शोध लावल्याचे सांगितले जात आहे. खरेतर हे औषध किंवा त्यातील घटक बायपोलर डिसऑर्डर या मेंदूशी निगडित आजारावर उपयुक्त ठरतात. मात्र, त्याची करोनाबाधितांवरही चाचणी करण्यात आली असता त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्याचेही सांगण्यात येत आहे. हे औषध करोना विषाणूची प्रतिकृती (रेप्लकेशन) बनवण्यापासून रोखत असल्याचे आढळून आले आहे. रुग्णाच्या शरीरातील विषाणूंची संख्या वाढू लागते व त्यामुळे रुग्णाची प्रकृती खालावते. या विषाणूंची वाढ रोखण्यासाठी हे औषध रामबाण ठरेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

बायोलॉजिकल मोलिक्‍यूल्सच्या मॉडेलिंग तंत्रज्ञानाचा वापर करत संशोधकांनी संभाव्य व सध्या प्रचलित असलेल्या काही औषधी घटकांचा संयोग करत या औषधाची निर्मिती केली आहे. या औषधामुळे करोनाबाधितांवर उपचार करणे शक्‍य आहे, असा दावाही संशोधकांनी व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.