नगर – बुधवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने भिंगार शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर आज गुरुवारी दुपारनंतर हा वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यामुळे बुधवारी रात्रभर भिंगाकरांना जागुन काढावी लागली. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली.
असतांना पावसामुळे विद्युत वाहन तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले.
बुधवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे भिंगार शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
त्यानंतर रात्री देखील भिंगार शहरात पूर्ण अंधार होता. वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने रात्री भिंगारकरांना झोप लागली नाही. त्यात डासांचे प्रमाण वाढल्याने त्यात झोप लागले अशक्य झाला होते. तसेच रात्री पाऊस देखील सुरू होता. त्यामुळे घराबाहेर देखील पडता येत नव्हते. घराबाहेर अंधार अन् घरात असलेल्या अंधारामुळे डांसानी फोडून काढले.
त्यामुळे भिंगारकर वैतागले होते. आज दुपारी वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र अद्यापही काही भागात वीज पुरवठा सुरू झालेला नव्हता. याकडे भिंगार महावितरण विभाग दुर्लक्ष केले आहे.