मुंबई – पापाराझी बॉलिवूड स्टार्सच्या मागे एका फोटोसाठी हवं घेतांना दिसतात. स्टार्सचे फोटो मिळण्यासाठी पापाराझी तारेवरची कसरत करत असतात. अशात अनेकदा स्टारही त्यांच्या कामाचे कौतुक करतात. अशात बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचा पापाराझीसोबतचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.
आलियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून लाखो चाहते खूश झाले आहेत. संध्याकाळी आलिया भट आई आणि बहिणीसोबत बाहेर गेली होती. जिथे पापाराझीने त्यांना आपापल्या कॅमेऱ्यात कैद केले. यादरम्यान आलिया तिच्या आईसोबत चालत कारच्या दिशेने निघाली. तेवढ्यात आलियाचीची नजर जवळच पडलेल्या चप्पलवर पडली. चप्पल पाहून तिने विचारले ही चप्पल कोणाची आहे. ज्यावर एका कॅमेरामनने सांगितले की ते माझी चप्पल आहे. मग आलियाने स्वतः खाली वाकून तिच्या हातातून पापाराझीची चप्पल उचलली आणि त्याला दिली.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. पहिल्यांदाच एखादा मोठा स्टार असे काम करताना दिसला आहे. आलिया भट्टच्या या कृतीवर तिचे चाहते कौतूक करत आहे. या व्हिडिओवर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.