पुणे : पुण्यात आगीची एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील येवलेवाडीतील गोडाऊला भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग इतकी भीषण आहे की, धुराचे लोट सर्वदुर पसरले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून घटनास्थळी एकुण १२ अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
कापड आणि पडद्याच्या गोदामाला ही भीषण आग लागली आहे. ८ फायर इंजिन आणि ७ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानुसार आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.