नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाने नुकतीच जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय टेबल टेनिस संघाने जागतिक टेबल टेनिस क्रमवारीत आठव्या स्थानी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे हे भारतीय संघाचे आजवरचे सर्वोत्तम स्थान आहे. भारतीय संघाच्या खात्यात २८० अंक आहेत. टेबल टेनिस संघ क्रमवारीत चीन हा अव्वलस्थानी आहे. त्यानंतर क्रमवारीत जापान दुस-या तर जर्मनी तिस-या स्थानी विराजमान आहे.
New High yet again💪
The Indian Men’s table tennis team have climbed up one spot more to achieve highest ever World Team Ranking #8 !!!
Its a huge confidence booster before we take on the rest of the world in World Olympic team qualifiers scheduled next month in Portugal !! pic.twitter.com/MQ8U75IG91
— Sathiyan Gnanasekaran OLY (@sathiyantt) December 3, 2019
नुकत्याच झालेल्या टेबल टेनिस विश्वचषकामध्ये साइमन गोजीचा पराभव करत उप-उपांत्य फेरी गाठणारा भारताचा जी. साथियान पुरूष क्रमवारीत ३० व्या स्थानी आहे, तर शरथ कमाल ३६ व्या स्थानी आहे. आयटीटीएफ चॅलेज इंडोनेशिया ओपन जिंकणारा हरमीत देसाईने १९ व्या स्थानाची झेप घेत ८५ वे स्थान पटकावले आहे.
महिला क्रमवारीत भारताची मनिका बात्रा ६१ व्या स्थानी विराजमान आहे, भारताची आयाहिका मुखर्जी ११८ आणि मधुरिका पाटकर १२४ व्या स्थानी आहे.