तो मोबाईल नंबर सनी लिओनचा नाही

हॉट ऍक्‍ट्रेस सनी लिओनचे आकर्षण तिच्या फॅन्समध्ये प्रचंड आहे. पण यामुळे दिल्लीतल्या एका युवकाला मात्र खूप मनस्ताप व्हायला लागला आहे. अलिकडेच रिलीज झालेल्या “अर्जुन पटियाला’मध्ये सनी लिओन पोलिसांना आपला मोबाईल नंबर देते, असा एक सीन आहे. मात्र तिचा हा मोबाईल नंबर प्रत्यक्ष्यात सनी लिओनचा नाही. तर तो निर्माते-दिग्दर्शकांचा एक काल्पनिक नंबर आहे.

हा सनी लिओनचाच नंबर आहे, असे समजून दररोज शेकडो फॅन्स या नंबरवर फोन करायला लागले आहेत. वास्तविक हा नंबर दिल्लीतल्या प्रीतमपुरा भागात राहणाऱ्या पुनीत अग्रवाल या युवकाचा आहे. त्याला सनी लिओनच्या फॅन्सच्या कॉल्सचा प्रचंड मनस्ताप व्हायला लागला आहे. त्याला दररोज चारशे ते पाचशे जणांचे फोन यायला लागले आहेत. फोन करणाऱ्या व्यक्‍ती पुनीतशी अश्‍लील संभाषण करतात. त्यांना तोंड देता देता पुनीतची मात्र पुरती दमछाक व्हायला लागली आहे.

शेवटी कंटाळून त्याने मौर्या इन्क्‍लेव्ह पोलिसांकडे “अर्जुन पटियाला’चे निर्माते आणि दिग्दर्शकांच्या विरोधात तक्रारच दाखल केली आहे. मात्र या सगळ्याबाबत सनी लिओनची अजून काहीच प्रतिक्रिया समजलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)