मुंबई – हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आढाव्यानंतर कुंभमेळा काळात करोनाचा उद्रेक होण्याचा इशारा दिला होता.
यातच मिळलेल्या माहितीनुसार, या महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर १०२ साधू व भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरं शाही स्नान पार पडलं. पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तर दुसरीकडे कुंभमेळ्यात करोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासन हतबल झालं आहे.
What you are seeing is not KUMBH MELA but it’s a CORONA ATOM BOMB ..I wonder who will be made accountable for this VIRAL EXPLOSION pic.twitter.com/bQP9fVOw5c
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 13, 2021
दरम्यान, याच मुद्यावरून बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी कुंभमेळ्यातील गर्दी पाहून नाराजी व्यक्त केली आहे. राम गोपाल वर्मा यांनी ट्विटर अकाऊंटवर कुंभमेळ्यातील अफाट गर्दीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी “तुम्ही पाहात असलेला कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे… मला आश्चर्य वाटते की या एक्सप्लोजरचा दोष कोणाला द्यायचा’ या आशयाचे कॅप्शन रॅम गोपाल यांनी दिलं आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशलवर जोरदार व्हायरल असून, अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.
The Delhi Jammat super spreader of March 2020 is like a short film compared to today’s BAHUBALIian KUMBH MELA ..All us Hindus owe an apology to Muslims because they did back then when they dint know and we did this one year after we fully know 🙄🙄🙄 pic.twitter.com/2fMF3uUtiG
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 12, 2021