लस घ्या, FD वर जास्त व्याज मिळवा!!!

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने काढली स्कीम

नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तर, देशातील लसीकरणही वेगाने होत आहे. या लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एक स्कीम आणली आहे. या स्कीम अंतर्गत ज्या लोकांनी लस घेतली आहे, त्यांना FD वर ज्यास्त व्याज मिळेल. जाणून घ्या या स्कीमबद्दल…

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने फिक्स्ड डिपॉझिट स्कीम लॉन्च केली आहे. या स्कीमचे नाव ‘इम्यून इंडिया डिपॉझिट’ आहे. या स्कीम अंतर्गत फिक्स्ड डिपॉझिट (FD) केल्यावर चालू व्याज दरावर 0.25% जास्त लाभ मिळेल. कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तीला या स्कीमचा फायदा घेता येईल. त्यांना चालू व्याज दरापेक्षा 0.25% ज्यास्त व्याज मिळेल. तसेच, कोरोना लस घेणाऱ्या जेष्ठ नागरिकांना 0.50% जास्त व्याज दिले जाईल. लस न घेणाऱ्यांना या स्कीमचा फायदा घेता येणार नाही.

बँकेने सोशल मीडिया पोस्टमध्ये या स्कीमबद्दल माहिती दिली आहे. स्कीमचा मॅच्योरिटी पीरियड 1,111 दिवसांचा आहे. ही स्कीम ठराविक काळासाठी लॉन्च केली आहे. कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तीला या स्कीमचा फायदा घेता येईल. त्यांना चालू व्याज दरापेक्षा 0.25% ज्यास्त व्याज मिळेल. तसेच, कोरोना लस घेणाऱ्या जेष्ठ नागरिकांना 0.50% जास्त व्याज दिले जाईल. बँकेने सांगितले की, जास्तीत जास्त लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही स्कीम लॉन्च केली आहे.

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया सध्या 7 दिवस ते 10 वर्षापर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 2.75 ते 5.1% पर्यंत व्याज देते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.