ISSF World Cup 2024 Cairo Egypt shooting : अखिल श्योराणने बुधवारी ISSF विश्वचषक काहिरा 2024 मध्ये पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. यासह भारताने सहा पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावत आपल्या मोहिमेची सांगता केली.
Team 🇮🇳 wraps it up with 6⃣🎖️ (2⃣🥇 3⃣🥈& 1⃣🥉) in total at the #ISSF World Cup, Cairo🥳#Shooting🔫
The last one to enter the medal club, let us all congratulate #TOPScheme Athlete Akhil Sheoran for clinching a beautiful #Bronze🔥in Men’s 50m 3P, with a score of 451.8.
Well… pic.twitter.com/AJjjMcmS26
— SAI Media (@Media_SAI) February 1, 2024
वर्षातील पहिल्या ISSF विश्वचषकात भारताने सहा पदके जिंकली, ज्यात दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्य पदकांचा समावेश होता. त्याच वेळी, ग्रेट ब्रिटन दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकांसह पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर तर जर्मनी दोन सुवर्ण आणि तीन कांस्य पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
काहिरा स्पर्धेच्या अंतिम दिवशी, भारताच्या अखिल श्योराणने पात्रता फेरीत 589 गुणांसह दुसरे स्थान मिळवत अंतिम फेरीत धडक मारली होती आणि आठ जणांच्या 45 शॉटच्या अंतिम फेरीत 451.8 गुण मिळवले. चेक रिपब्लिकच्या अनुभवी जिरी प्रिवारत्स्कीने 462.9 गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर फ्रान्सच्या दोन वेळा ज्युनियर विश्वविजेत्या रोमेन ऑफ्रेरेने 460.5 गुणांसह रौप्यपदक पटकावले.
ILCA 7 Men World Championship 2024 : भारताच्या विष्णूने नौकानयनात मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…
ISSF विश्वचषक 2024 : भारताचे पदक विजेते
दिव्यांश सिंग पनवार – पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक
रिदम सांगवान/उज्ज्वल मलिक – 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक
सोनम उत्तम मस्कर – महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये रौप्य पदक
अर्जुन बबुता/सोनम उत्तम मुस्कर -10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्य पदक
अनुराधा देवी – महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये रौप्य पदक
अखिल श्योराण – पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक