जेरुसलेम (इस्रायल) : इस्त्राईलमध्ये नव्याने निवडलेल्या संसदेने गुरुवारी शपथ घेतली. देशात यावर्षी दुसऱ्यांदा झालेल्या निवडणुकीत अनिर्णीत स्थिती कायम आहे. राजकीय क्षितीजावर कोणतेही नवीन सरकार अस्तित्वात येण्याची अजूनही कोणतीही चिन्हे नाहीत.
पंतप्रधानपदासाठीच्या दोन मुख्य उमेदवारांमध्ये देशाचे नेतृत्व कोण करावे याविषयी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरील पूर्व सुनावणीच्यावेळीच संसदचा शपथविधीचा कार्यक्रम झाला. त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची वेळ आली आहे. नेतान्याहू किंवा त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी बेनी गॅन्ट्झ यांनाही त्यांच्या मित्रपक्षांसह संसदीय बहुमत मिळवता आले नाही. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत झालेल्या तिसऱ्या निवडणुकीचा एकमेव पर्याय म्हणून आता त्यांना आघाडी सरकारसाठी एकमेकांवर अवलंबून रहावे लागते आहे.